गाय-गोठा अनुदान योजना

Gai Gotha Anudan Yojana 2025

गाय-गोठा अनुदान योजना

गाय-गोठा अनुदान योजना 

Gay Gotha Anudan Yojana

 

ग्रामीण भागात जास्तीत जास्त पशुपालन व्यवसाय केला जातो. पण, जनावरांना राहण्यासाठी व्यवस्थित जागा राहत नाही. त्यामुळे त्यांना काही वेळा इजा पोहचण्याची शक्यता असते. पशुंना इजा पोहचू नये आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, हाच विचार करून राज्य सरकारने 2024 मध्ये गाय-गोठा अनुदान योजना सुरू केली आहे. ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना असून यातून शेतकऱ्यांना त्यांच्या गाई-म्हशीसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होते.

 

काय आहे ही योजना?

गाय-गोठा अनुदान योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गोठा बांधणीसाठी आणि त्याचबरोबर पशुपालन व्यवस्थित व स्वच्छ ठेवण्यासाठी आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. ही मदत शेतकऱ्यांना अनुदान म्हणून पैशाच्या स्वरूपात केली जाते. म्हणजेच गोठा बांधणीसाठी लागणाऱ्या खर्चाचा काही भाग शासनाकडून अनुदान स्वरूपात सरकारकडून पशुपालकांना दिला जातो.

 

योजनेचा उद्देश Gay Gotha Anudan Yojana

  • ·    जनावरांचे व्यवस्थित पालन पोषण करणे.
  •      शेतकऱ्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • ·    उत्तम दूध उत्पादनाला चालना देणे.

 

गाय गोठा अनुदान योजनेचे फायदे

·       ₹77,000 पासून ₹3 लाखांपर्यंतचे अनुदान उपलब्ध.

·       गोठ्यांचे बांधकाम अधिक सुव्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने करता येते.

·       शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होते.

·       अर्जाची प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे.

·       गोठ्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक सहाय्य.

 

अनुदानाची रक्कम कशी ठरते?

Gay Gotha Anudan Yojana 

·       2 ते 6 जनावरांसाठी: ₹77,000 पर्यंत अनुदान.

·       6 ते 12 जनावरांसाठी: ₹1,54,000 पर्यंत अनुदान.

·       12 ते 18 जनावरांसाठी: ₹2,31,000 पर्यंत अनुदान.

·       18 पेक्षा जास्त जनावरांसाठी: ₹3,00,000 पर्यंत अनुदान.

 

 

योजनेसाठी पात्रता Gay Gotha Anudan Yojana Documents

·       अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा.

·       अर्जदाराकडे किमान 2 जनावरं असावी.

·       अर्जदाराने शासकीय अटी आणि शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत.

·       अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

·       शेतकऱ्यांचा सात बारा आणि आठ अ उतारा.

·       शेतकऱ्यांचे आधार कार्ड.

·       बँक पासबुकची झेरॉक्स.

·       शेतकऱ्यांचा पासपोर्ट साईज फोटो.

·       गोठा बांधायच्या जागेचा फोटो.

·       जनावरांचा फोटो.

·       ग्रामपंचायतीचा ठराव.

 

अर्ज कोठे करावा?

·       ग्रामपंचायत ऑफिस: आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये अर्ज उपलब्ध आहे.

·       पंचायत समिती ऑफिस: तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात देखील अर्ज करता येतो.

अधिक माहितीसाठी - येथे क्लिक कर 

*************************************************************************