सोन्याचे भाव आता कमी होणार का ? भारतातील ओडिसा राज्यामध्ये सोन्याचा साठा आढळून आलेला आहे

राज्यामध्ये सोन्याचा साठा आढळून आलेला आहे ओडिसा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा सोन्याचा साठा मिळालेला आहे संपूर्ण देशासाठी ही महत्त्वाची बातमी आहे ओडिशाचे खाणकाम विभागाचे मंत्री विभूती भूषण जेना यांनी ओडिशाच्या विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली आहे ओडिशातील

सोन्याचे भाव  आता कमी होणार का ? भारतातील ओडिसा राज्यामध्ये सोन्याचा साठा आढळून आलेला आहे

सोन्याचे भाव वाढल्यामुळे ते आता गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्या बाहेर जाताना दिसतय काही दिवसांपूर्वी आपण सोन्याचे भाव इतके का वाढतायत हे सांगताना भारत सोन्याची मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो ज्याच्यामुळे सोनं महाग मिळतं हे सांगितलेलं होतं पण आता एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.

 भारतातील ओडिसा राज्यामध्ये सोन्याचा साठा आढळून आलेला आहे ओडिसा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा सोन्याचा साठा मिळालेला आहे संपूर्ण देशासाठी ही महत्त्वाची बातमी आहे ओडिशाचे खाणकाम विभागाचे मंत्री विभूती भूषण जेना यांनी ओडिशाच्या विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली आहे.

ओडिशातीलअनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडलेले आहेत ज्याच्यामुळे या परिसरामध्ये आणखीन खाणकाम केलं जाऊ शकतं आणि या सोन्याच्या साठ्याच्या शोधामुळे या राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यासोबतच आता ओडिसामध्ये जे सोन्याचे साठे सापडलेले आहेत याच्यामुळे भारताचं सोन्याच्या आयातीवरच अवलंबित्व कमी होईल आणि भारतातील सोन्याचे भाव कमी होतील असं सुद्धा एक गृहीतक मांडलं जातय या गृहीतकामध्ये कितपत तथ्य आहे. 

ओडिसामधील तीन जिल्ह्यांमध्ये नऊ ठिकाणी सोन्याचे साठे सापडल्याची माहिती ओडिसा सरकारने दिली होती तेव्हा देवगड किझर मयूरभंज या ठिकाणी सोन्याचे नऊ साठे सापडलेले होते असच एकदा 2022 दरम्यान राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यामध्ये कोठडी भागामध्ये सुद्धा सोन्याची मोठी खान सापडल्याची माहिती समोर आलेली होती मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशनने 2008 मध्ये कोठळी भागामध्ये सर्वेक्षण केलं होतं. ज्याच्यानुसार जमिनीमध्ये सोने आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचं समोर आलेलं होतं त्यावेळेस जमिनीखाली 60 ते 160 मीटर आतमध्ये खाणीमध्ये जवळपास 600 किलो सोनं आणि 250 टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता .

ओडिशाला भारतातील सर्वात श्रीमंत खनिज प्रदेशाच्या यादीमध्ये सामील होण्याची संधी सुद्धा प्राप्त झालेली आहे भारतामध्ये सोनं फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे फार कमी ठिकाणी त्याच उत्खनन करण्यात आलेल आहे आणि जवळपास ज्या काही खानी आपले इथं आहेत आता त्या ठिकाणी सोनं मिळणं जवळपास बंद झालेल आहे त्याच्यामुळे आता जे सोन्याचे साठे सापडलेले आहेत हे भारतासाठी फार महत्त्वाचे आहेत मयूरभईन जिल्ह्यामध्ये जशीपूर सूर्यागुडा रुसी इदेलक कुचा मिरेदेही सुलेपत आणि बदाम पहार यासारख्या अनेक ठिकाणी सोन्याचे साठे असल्याची माहिती समोर येते यापूर्वी देवगड जिल्ह्यातील आदासा रामपल्ली परिसरामध्ये तांब्याच्या उत्खनना दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सापडलेलं होतं केवजर जिल्ह्यामध्ये गोपूर गाझपूर सालेखाना आणि दिमेरी मुंडा या भागामध्ये सुद्धा सोन्याचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे ओडिसा सरकार देवगड जिल्ह्यातील पहिल्या सोन्याच्या खाण्याचा ब्लॉकचा लिलाव करण्याची योजना सुद्धा आखताना दिसून येते म्हणजेच काय सोन्याचे  साठे सापडलेले आहेत याची पुष्टी झालेली आहे लिलाव करणार म्हणजे जवळपास सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत .

सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये याच्यातून जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर ओडिसामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात इतकंच आजच्या दिवशी आपण म्हणू शकतो आता या सोन्याच्या किंमती जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आपल्याला वाढलेल्या दिसतायत. 

सोन्याच्या किमतीमध्ये चड उतार दिसून येतो यासोबतच खान उत्पादन सोन्याच्या पुरवठ्यासह त्याचा पुनर्वापर आणि सेंट्रल बँक यांनी जर का मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची विक्री केली तरी सुद्धा याच्या किमतीमध्ये चढ उतार आपल्याला दिसून येतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सोन्याची किंमत ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात त्याच्यामुळे आजच्या दिवशी जर का आपण बघितलं तर आपल्याला भूराजकीय तणाव मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येईल म्हणजे इजराईल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे इरान सुद्धा संघर्षामध्ये आधीमध्ये येताना दिसतो अमेरिका जे आहे अमेरिका सुद्धा थोडीशी अग्रेसिव्ह भूमिका घेताना आपल्याला दिसून येते . 
 रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये संघर्ष सुरूच आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी सोन्याच्या किंमतीमध्ये दिलासा मिळेल ही आशा सध्या तरी चुकीची वाटते आणि भारतामध्ये सोन्याचे साठे सापडलेले आहेत म्हणून लगेच उद्यापासून किंमती कमी होतील हे सुद्धा गृहीतक चुकीच आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.